Tuesday, 14 November 2017

साहित्य:
  • तोंडली चिरलेली १00 ग्राम 
  • 6 वांगी चिरलेली
  • 2 टोमॅटो चिरलेला 
  • 1 गाजर किसलेले
  • १ लहान वाटी चिरलेला कोबी
  • लाल तिखट 1 चमचा
  • किचन किंग मसाला 1 चमचा
  • तंदूरी मसाला 1 चमचा
  • काश्मिरी मिरची पावडर 1 चमचा
  • हिंग 
  • मीठ
  • तेल
  • शेव 
कृती :
  • एका कढईत 2 चमचे तेल गरम करा.  टोमॅटो, हिंग, लाल तिखट, काश्मिरी लाल तिखट घाला.
  • 3 मिनीटे शिजवा. उर्वरित भाज्या घालून चांगले मिक्स करावे.
  • किचन किंग मसाला, तंदूरी मसाला, मीठ घाला.
  • थोडे पाणी घाला आणि शिजवा. पाणी आटल्यावर आणखी ५ मिनटे शिजवा.
  • शेव टाकून पावाबरोबर गरमागरम वाढा