साहित्य:
- तोंडली चिरलेली १00 ग्राम
- 6 वांगी चिरलेली
- 2 टोमॅटो चिरलेला
- 1 गाजर किसलेले
- १ लहान वाटी चिरलेला कोबी
- लाल तिखट 1 चमचा
- किचन किंग मसाला 1 चमचा
- तंदूरी मसाला 1 चमचा
- काश्मिरी मिरची पावडर 1 चमचा
- हिंग
- मीठ
- तेल
- शेव
कृती :
- एका कढईत 2 चमचे तेल गरम करा. टोमॅटो, हिंग, लाल तिखट, काश्मिरी लाल तिखट घाला.
- 3 मिनीटे शिजवा. उर्वरित भाज्या घालून चांगले मिक्स करावे.
- किचन किंग मसाला, तंदूरी मसाला, मीठ घाला.
- थोडे पाणी घाला आणि शिजवा. पाणी आटल्यावर आणखी ५ मिनटे शिजवा.
- शेव टाकून पावाबरोबर गरमागरम वाढा